नोकरी देण्याच्या आमिषाने 7 लाख 80 हजाराची फसवणूक; दोघे अटकेत!

पिंपरी : नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनीच्या खात्यावर तसेच विविध कन्सल्टन्सीच्या मार्फत सात लाख 80 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना नोव्हेंबर 2025 ते आज पर्यंत गेरा इम्पेरियर ,गाळा ऑफिस नंबर 905, विप्रो सर्कल फेस 2, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे .

पांडुरंग पद्माकर केंद्रे (वय 23,रा.दत्त कॉलनी,लक्ष्मी चौक,हिंजवडी ,मूळ पत्ता-मु.पो.गुत्ती,ता.जळकोट,जि.लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एक्यूअर सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड, गेरा इम्पेरियर, गाळा ऑफिस नंबर 905, हिंजवडी या कंपनीचे संचालक अमोल बाळासाहेब महाडिक, ओंकार दादासो महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी व साक्षीदारांकडून कंपनीच्या खात्यावर तसेच विविध कन्सल्टन्सीच्या मार्फत पैसे घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन, काम करून घेऊन, कोणतेही प्रोजेक्ट न देता वेगवेगळी कारणे देऊन त्यांचा विश्वासघात करून 7 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी व अन्य साक्षीदारांकडून घेतलेली रक्कम स्वतःसाठी वापरली. फिर्यादीने नोकरी करिता भरलेले पैसे आरोपीकडे परत मागितले असता त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांनी अन्य कंपन्यांमध्ये नोकरी लावू शकतो असेही अमिष दाखवले. कंपनीचे एजंट असल्याचे सांगून कमिशन वजा डिपॉझिट घेतले आहे .सदर कंपनीचे ऑफिस सध्या बंद आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे हे तपास करत आहेत.

