फक्त मुद्द्याचं!

22nd April 2026
गुन्हेगारी

पिंपळे सौदागर येथील दुकानदाराकडे चार लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक!

पिंपळे सौदागर येथील दुकानदाराकडे चार लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक!

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील ‘द मोमोवाला’ दुकानदाराकडे चार लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार 20 एप्रिल रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन रोडवरील द मोमोवाला दुकानात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी करण सतन कापरी (वय 20, रा. कुणाल आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर,मूळ पत्ता- रोहिणी,तहसील जेसडी,जि.देवघर,झारखंड ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोपान गजानन बुलाखे (वय 21, रा केशवनगर, चूल मटन हॉटेल जवळ, अनिल काटे यांच्या खोलीत भाड्याने, पिंपळे सौदागर), ओंकार उद्धव बाबर (वय 20, रा. श्याम साठे यांच्या खोलीत, काटे वस्ती), विवेक विनोद अंबोरे (वय 18, सध्या राहणार वांजळे यांच्या भाड्याच्या रूम मध्ये, मुंजोबा चौक जवळ, पिंपळे सौदागर, मूळ पत्ता- केळवदवाडी,ता.चिखली,जि.बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर फिर्यादी यांचे ‘द मोमोवाला’ दुकान आहे .आरोपी हे दुचाकी सायकलवरून दुकानांमध्ये येऊन फिर्यादी यांच्याकडे चार लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या हातातील कोयता फिर्यादी यांच्यावर उगारून तसेच कोयत्याने व दुसऱ्या मुलाने स्टूलने दुकानातील साहित्याची, लॅपटॉपची व कस्टमर यांच्या कारची तोडफोड करून, शिवीगाळ व दमदाटी केली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"