फक्त मुद्द्याचं!

22nd April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे कोडिंग मेळ्याचे यशस्वी आयोजन!

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे कोडिंग मेळ्याचे यशस्वी आयोजन!

पिंपरी : लिडरशीप फॉर इक्विटी यांनी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि योजक फाऊंडेशन यांच्या सहकार्याने रोडटूकोड कार्यक्रमांतर्गत उत्साहपूर्ण विद्यार्थी कोडिंग मेळ्याचे यशस्वी आयोजन केले.

या कार्यक्रमांतर्गत ऑगस्ट २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यानी कोडिंग कोर्स पूर्ण केला. या कोर्स दरम्यान विद्यार्थ्यांनी ब्लॉक-आधारित कोडिंग प्रकल्प सादर केले तसेच व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) आणि ३ डी प्रिंटिंग यांचा अनुभव घेतला. Code.org चा कम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध करून देत डिजिटल शिक्षणासाठी भाषेची अडचण दूर करण्यात आली.

viara vcc
viara vcc

या मेळाव्यात ३० पेक्षा अधिक शाळांमधील ८० विद्यार्थ्यांनी २५ पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले, ज्यातून विद्यार्थ्यांच्या संगणकीय विचारसरणी, सर्जनशीलता, सहकार्य आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा उत्कृष्ट प्रत्यय आला. हे प्रकल्प पर्यावरणीय आव्हाने, सामाजिक प्रश्न, अॅनिमेशन आणि इंटरॅक्टिव्ह गेम्स यांसारख्या विषयांवर आधारित होते आणि स्प्राईट लॅब च्या साहाय्याने विकसित करण्यात आले.

या उपक्रमात योजक फाऊंडेशन चे ६० विद्यार्थी , जय भवानी प्राथमिक शाळेचे २० विद्यार्थी यांनीही आपले प्रकल्प सादर केले
कोडिंग मेळ्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी, तर्क स्पष्ट करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता दाखवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमास प्रवीण तुपे, संचालक, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, डॉ. श्रद्धा खंपरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, योजक फाऊंडेशन चे प्रोग्राम मॅनेजर– श्याम वावरे ,तुषार झा, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, लिडरशीप फॉर इक्विटी उपस्थित होते.

हा कोडिंग मेळा केवळ प्रकल्पांचे प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणाऱ्या नवोन्मेषकांचा उत्सव ठरला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्जनशीलता व्यक्त करणे आणि अर्थपूर्ण समस्या सोडवणे या दिशेने विद्यार्थ्यांची होत असलेली प्रगती या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि त्यांना विचारशील व जबाबदार नागरिक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"