फक्त मुद्द्याचं!

22nd April 2026
गुन्हेगारी

सायबर आंतरराज्य टोळीतील नऊ गुन्हेगारांना प्रथमच मोका!

सायबर आंतरराज्य टोळीतील नऊ गुन्हेगारांना प्रथमच मोका!

तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊ सदस्यांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांचे सध्या मोठ्या प्रमाणावर पेव निर्माण झाले असून ज्येष्ठ नागरिकांना ते टारगेट करत आहेत.

viara vcc
viara vcc

अभय बाबासाहेब पाटील (रा. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (रा. वाघोली, पुणे), युवराज उर्फ संतोष सतीश मुदलियार (रा. लोहगाव, पुणे) रॉनी उर्फ पंकज मंगू गिरीगोस्वामी (रा. उदयपूर, राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (रा उदयपूर राजस्थान), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (रा.राजस्थान), महेश करबसपा उडचणे (रा. दहिसर, मुंबई), शेख अब्दुल रहीस शेख अब्दुल रशीद (औरंगाबाद) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

2 कोटी 65 लाख 76 हजार रुपये विविध बँक खात्यामध्ये गोठवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात एका सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली होती बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे त्यांना शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून त्यांची 11 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार तांत्रिक विश्लेषण करून यातील दोन कोटी 65 लाख 76 हजार रुपये विविध बँक खात्यामध्ये गोठवले होते. जे आता न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत मिळणार आहेत. पोलीस तपास पथकाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थान मधील उदयपूर येथून नऊ जणांना अटक केली. या आरोपींनी संघटित टोळी बनवून सर्वसामान्यांची फसवणूक केली होती.

आरोपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात
तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात होते. फसवणुकीची रक्कम ते युएसडीटी सारख्या आभासी चलनामध्ये वर्ग करत असत. डिजिटल माध्यमांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याने ही संघटित गुन्हेगारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आंतरराष्ट्रीय टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सादर केला होता. कागदपत्राच्या छाननी नंतर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे ,पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (एक) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"