फक्त मुद्द्याचं!

22nd April 2026
पिंपरी-चिंचवड

उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाचा व तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पशुवैद्यकीय व कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त म्हणून संदीप खोत हे काम पाहत होते. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार (पशुवैद्यकीय विभागासह) सोपविण्यात आला आहे. उपायुक्त खोत यांच्याकडील कामगार कल्याण विभागाचा पदभार सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय सहाय्यक आयुक्त नरळे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे असणारे आपत्ती व्यवस्थापन व अभिलेख कक्षाचा देखील पदभार देण्यात आला आहे.

तर सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडील सध्याचा इ क्षेत्रीय कार्यालयाचा क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"