फक्त मुद्द्याचं!

21st April 2026
गुन्हेगारी

फ्लॅटवर एकाच बँकेचे कर्ज असल्याचे सांगून ९२ लाख रुपयांची फसवणूक!

फ्लॅटवर एकाच बँकेचे कर्ज असल्याचे सांगून ९२ लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : फ्लॅट विक्री करताना फ्लॅटवर फक्त एकाच बँकेचे कर्ज आहे असे सांगून सुमारे ९२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना चार जानेवारी 2022 रोजी व 14 नोव्हेंबर 2025 रोजी फ्लॅट नंबर 401, ए विंग, कोहिनूर टाॅवर, क्रोमा मॉल च्या मागे, पिंपरी येथे घडली.

याबाबत ज्ञानेश्वर आबासाहेब कासार (वय 41, रा. फ्लॅट नंबर 401, ए विंग ,कोहिनूर टॉवर, क्रोमा मॉलच्या मागे पिंपरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युनूस महंमद शेख (वय 49, रा. कोळी हॉस्पिटल समोर, फ्लॅट नंबर दोन, इंद्रा विहार बिल्डिंग, देहूरोड, किवळ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कोहिनूर टाॅवर, ए विंग ,फ्लॅट नंबर 401, पिंपरी हा फ्लॅट विक्री केला असून विक्री केलेल्या फ्लॅटवर ॲक्सिस बँक व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून कर्ज घेतलेले आहे. मात्र आरोपीने फिर्यादी यांना केवळ बँक ऑफ इंडियाचे कर्ज असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून एकूण 92 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

अमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्यास व्यक्तीस अटक!
पिंपरी :अमली पदार्थ 27 हजार 400 रुपये किमतीचा 348 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली. ही घटना शनिवार 19 एप्रिल रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास वडजाई नगर, बारामती ॲग्रो चिकन शेजारी, माणगाव रोड, हिंजवडी येथे घडली.

याबाबत मितेश मोहन यादव (वय 34, पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिपिन कुमार पृथ्वीपाल प्रजापती (वय 20,रा.बोडकेवाडी फाटा,मंदिराच्या जवळ,पांडवनगर,माणगाव,ता.मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 27 हजार 400 रुपये किंमतीचा 348 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता जवळ बाळगला. हा गांजा त्याने कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गांजा हा गायवाली गिताबाई (रा. भाटनगर, पिंपरी) हिचेकडून विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल देखील जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"