फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
गुन्हेगारी

कोयत्याचा धाक दाखवीत जबरदस्तीने 14 हजार रुपयांची लूट!

कोयत्याचा धाक दाखवीत जबरदस्तीने 14 हजार रुपयांची लूट!

तळेगाव : गाडीमध्ये पेट्रोल भरून रूमवर येत असताना पाठीमागून एक्सेस दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी कोयत्याचा धाक दाखवीत जबरदस्तीने 14 हजार रुपयांची लूट केली. ही घटना शुक्रवार 17 एप्रिल रात्री साडे अकरा ते शनिवार 18 च्या 18 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजनेच्या दरम्यान तळेगाव दाभाडे बस स्टँड जवळ, लोकमान्य शाळेच्या मागे, तळेगाव दाभाडे येथे घडली.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे .याबाबत सत्यम लक्ष्मीकांत मोरे (वय 20, खंडू शिंदे यांच्या फ्लॅटवर भाड्याने, समता कॉलनी,वराळे,ता.मावळ,मूळ रा.सरदारवाडी,ता.निलंगा, जि.लातूर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .करण आनंद घाडगे (वय 19, रा गोसावी वस्ती, एमएसईबी तळ्याच्या बाजूला, तळेगाव दाभाडे, ता.मावळ व तीन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण आनंद घाडगे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचे मित्र गाडीमध्ये पेट्रोल भरून फिर्यादी यांच्या रूमवर परत येत असताना पाठीमागून तपकिरी रंगाच्या एक्सेस दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवीत लोकमान्य शाळेच्या मागे, तळेगाव बस स्टॅन्डचे जवळ, नेऊन आरोपी यांनी त्यांचे दोन साथीदारांना तेथे बोलावून घेत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत फिर्यादीच्या गळ्यावर कोयता ठेवून फिर्यादी जवळील सहा हजार रुपये रोख रक्कम व तळेगाव चाकण रोडवरील बँक ऑफ बडोदा च्या एटीएम वर नेऊन 8000 रुपये रक्कम काढायला भाग पाडले. एकूण 14 हजार रुपये जबरदस्तीने काढून लूट केली. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"