फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
गुन्हेगारी

चार अल्पवयीन मुलांची भाईगिरी; कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी!

चार अल्पवयीन मुलांची भाईगिरी; कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी!

पिंपरी : फिर्यादी व त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना रस्त्यामध्ये उभे असलेल्या चार अल्पवयीन मुलांना बाजूला व्हा असे सांगितल्याने अल्पवयीन मुलांना राग आला. त्यांनी कोयत्याने एका जणांच्या डोक्यात,हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत असे जोरजोराने ओरडून सांगत होते. ही घटना बुधवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवम मेडिकल समोर टाॅवर लाईन चिखली येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी आर्यन राजाराम चव्हाण (वय 20, रा. श्रीराम कॉलनी, मोरे वस्ती, चिखली )यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चार अल्पवयीन मुलांवर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना सदर भागातील टवाळखोर अल्पवयीन आरोपी क्रमांक एक ते चार मुले रस्त्यावर थांबली होती .दुचाकीस्वराने हॉर्न वाजवून बाजूला व्हा असे म्हणाले. त्याचा राग आरोपींना आला. आरोपी क्रमांक दोन व चार यांनी फिर्यादीच्या जवळ येऊन तू आम्हाला ओळखत नाहीस का, आम्ही या भागातील भाई आहोत. आरोपी क्रमांक चार याने आरोपी एक व तीन यांना फिर्यादीस पकडण्यास सांगितले त्यावेळी फिर्यादीचा मित्र तेथून पळून गेला. फिर्यादीस पकडून आरोपी क्रमांक चार व आरोपी क्रमांक दोन यांनी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी केले. हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण करून तेथून पळून गेले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"