फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
गुन्हेगारी

अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार;आरोपीला अटक!

अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार;आरोपीला अटक!

पिंपरी :अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळेवाडी येथे सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी पीडीत चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .त्यानुसार विजय भोसले (वय 47, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे अमिष दाखवून तिला जवळच्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने चिमूरडी अस्वस्थ दिसून आल्याने तिच्या आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"