आसवानी डेअरडेव्हील्स , प्रतीक रॉयल्स विजयी!

प्रतीक रॉयल्सचा सुशील जाधव हा सामनावीर
पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माण – हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित पर्व दोन ‘ टी – २० प्रीमियर लीग ‘ या क्रिकेट स्पर्धेच्या २० षटकांच्या ‘ टी – २० सामन्यात आसवानी डेअरडेव्हील्स संघ आणि स्पोर्ट्स स्टोरीज अव्हेंजर्स संघ यांच्यात सामना झाला. काल (ता. ८ ) या संघाने स्पोर्ट्स स्टोरीज अव्हेंजर्स या संघावर ७ धावांनी तर गुरुवारच्या सकाळी प्रतीक रॉयल्स या संघाने विश्व टायगर्स या संघावर ६ विकेट्स आणि २.४ षटके राखून विजय मिळविला.

या क्रिकेट स्पर्धेच्या २० षटकांच्या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
प्रतीक रॉयल्स संघाचा विश्व टायगर्स संघावर ६ विकेट्स विजय
विश्व टायगर्स संघ – २० षटके, ९ बाद १३५ धावा : किरण मोरे – ३०, शाकिब शेख – २५, ओंकार यादव – ३०, विशाल गव्हाणे – ३०. शशांक साबळे –
२/ २९, पुरुषोत्तम खांडेभराड – २/२७, शेहबाझ सय्यद – २ / २७.
प्रतीक रॉयल्स – १७.२ षटके, ४ बाद १३६ धावा :
सुशील जाधव – ६६, रुद्र पटेल – २८, अभिषेक राव – २६.
गौतम पुटागे – १ / १, मनोज चौधरी – १ / १८, एम. वाघ – १ / २२. संभाजी १ / १८.
प्रतीक रॉयल्सचा सुशील जाधव हा सामनावीर ठरला. विश्व् टायगर्सच्या ओंकार यादव याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले.
अटीतटीच्या सामन्यात आसवानी डेअरडेव्हील्स संघाची स्पोर्ट्स स्टोरीज अव्हेंजर्स संघावर 7 धावांनी मात
आसवानी डेअरडेव्हील्स संघ – २० षटके, सर्वबाद १९० धावा : रिश नाले – १५, इंद्रजीत शिंदे – ५९, गुंजन – ३२ , ध्रुव मलिक – ३४, हिरा चौधरी – २०.
कुणाल त्रिपाठी – २/३७ , प्रशांत तेलंगे – २/२९, वरुण चौधरी – २ / २९, प्रथमेश बिरादर – २/२६.
स्पोर्ट्स स्टोरीज अव्हेंजर्स – २० षटके, ७ बाद १८३ धावा :
निनाद चौधरी – ६८ , चैतन्य कोंढभर – ६२ , शिमॉन – २२ हा नाबाद ठरला.
कुलदीप नायडू – २ / ३१ , हिरा चौधरी ४/ २३.
आसवानी डेअरडेव्हील्स च्या हिरा चौधरी याला सामनावीर हा ‘किताब देऊन गौरविण्यात आले. स्पोर्ट्स स्टोरीज अव्हेंजर्सच्या निनाद चौधरी याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले.

