फक्त मुद्द्याचं!

7th April 2026
गुन्हेगारी

तीन लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा जप्त ; एकास अटक

तीन लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा जप्त ; एकास अटक

पिंपरी : एका व्यक्तीने तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा सहा किलो ५५ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याचे सुमारास दळवी नगर कडून लोकमान्य हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत विशाल शिवाजीराव गायकवाड पोलीस हवालदार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जवाहर अर्जुनदास रामनानी (वय 68, रा. बी ब्लॉक 15, रूम नंबर एक, रिव्हर रोड पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा 6 किलो 55 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिंझुर्डे हे पुढील तपास करत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"