जमिनीचे खरेदी खत करून न दिल्याने 26 लाखाची फसवणूक!

पिंपरी : एका व्यक्तीने 15 हजार चौरस फूट जागे संदर्भात आपसात एम ओ यु केले. मात्र अद्याप पर्यंत खरेदी खत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्यांची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर 2020 ते आज पर्यंत आढले खुर्द, ता. मावळ येथे घडली.

या प्रकरणी संजय पांडुरंग नरोडे (वय 55, प्लॉट क्रमांक 403, सर्वे नंबर 161, 162, प्लॉट क्रमांक पाच, डीपी रोड औंध यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहन जयवंत येवले (वय 58 )आणि सौ आशा मोहन येवले (वय 51 दोघेही रा. आढले खुर्द, ता. मावळ )अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये आपसात मिळून आढले खुर्द येथील गट क्रमांक 255 मधील 15 हजार चौरस फूट जागे संदर्भात फिर्यादी यांच्याबरोबर एम ओ यु केला. सदर जागेचे अद्याप पर्यंत आरोपीने खरेदी खत करून दिलेले नाही. त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक दोन यांनी त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या बँक खाते क्रमांक वर आरटीजीएसद्वारे २० वीस लाख रुपये आणि आरोपी क्रमांक एक यांनी सहा लाख रुपये हे फिर्यादी यांच्याकडून घेतले आहेत. दोन्ही आरोपींनी 26 लाख रुपये घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केलेली आहे. शिवाय त्यांना मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पारखे हे तपास करत आहेत.

