फक्त मुद्द्याचं!

28th March 2026
पिंपरी-चिंचवड

झोपडपट्टी सेवाकराच्या माध्यमातून ९७ लाख ३५ हजार रुपयांची वसुली!

झोपडपट्टी सेवाकराच्या माध्यमातून ९७ लाख ३५ हजार रुपयांची वसुली!

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार सेवाकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १७ एप्रिल २०२५ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत ९७ लाख ३५ हजार ६६० रुपयांचा झोपडपट्टी सेवाकर वसूल झाला आहे.

viara vcc
viara vcc

चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली करदात्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने झोपडपट्टी सेवाकर भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील झोपडपट्टी सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवाकर भरण्यासाठी विभागाचे कार्यालय सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"