फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
गुन्हेगारी

विदेशी दारू विक्री प्रकरणी तिघे अटकेत; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई!

विदेशी दारू विक्री प्रकरणी तिघे अटकेत; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई!

पिंपरी : गोडाऊन मध्ये साठवून विदेशी दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार 19 मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चऱ्होली खुर्द परिसरातील शेतातील शेडमध्ये करण्यात आली.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दाभाडे सरकार चौक जवळील देवेंद्र तापकीर यांच्या मालकीच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी दारू विक्रीचा साठा केला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीन मधील अधिकारी व स्टाफ असे मिळालेल्या बातमी प्रमाणे देवेंद्र तापकीर यांच्या शेतामध्ये सापळा लावून अवैध दारूची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली.
रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय 33, रा. चऱ्होली खुर्द ,ता. खेड), तिलक हेमंत पटेल (वय 21, रा. वापी नाना, तांबडी ,ता. पारडी, जि. बलसाड, गुजरात) आणि अनिल रामसुरत यादव (वय 24, जनद कॉलनी, ता. पारडी, जि. बलसाड वापी, गुजरात) अशीअटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

याप्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ बोराडे (वय 44) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडे 2 लाख 480 रुपयांची विदेशी दारू साठवून ठेवलेली आढळली. हा साठा विक्रीसाठी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"