फक्त मुद्द्याचं!

18th March 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या उपक्रमात नागरिकांचा सकारात्मक सहभाग!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या उपक्रमात नागरिकांचा सकारात्मक सहभाग!

पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचना समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांनीसुरु केलेल्या “पोलीस आयुक्तांची भेट” या आगळावेगळ्या उपक्रमात एकूण 51 नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली .नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व सूचना ऐकून घेऊन त्यांचे योग्य ते निराकरण करण्यात आले.

viara vcc
viara vcc

सदर उपक्रमांतर्गत शहरातील नागरिक हे पोलीस आयुक्तांना दर सोमवारी दुपारी 04.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कोणतीही पूर्व परवानगी न घेता सहज भेटू शकतात. दिनांक 16 मार्च 2026 रोजी सदर उपक्रमांतर्गत पोलीस आयुक्तांच्या भेटीचा दुसरा दिवस यशस्वीरीत्या पार पडला. आज एकूण 51 नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. नमूद वेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली व सर्व पोलीस उपायुक्त समक्ष हजर होते तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व सूचना ऐकून घेऊन त्यांचे योग्य ते निराकरण करण्यात आले.

मागील सोमवारी देखील सदर कार्यक्रमास एकूण 76 नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग घेतला होता. सदर उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केलेले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी सदर उपक्रमास उपस्थित राहून त्यांच्या तक्रारी, समस्या व सूचना मांडाव्यात.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"