फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे : महापौर रवि लांडगे

महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे : महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवडमध्ये नैसर्गिक वायू प्रकल्पांना गती देण्यासाठी बैठक
पिंपरी : शहरातील नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी, तसेच विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) चे अधिकारी व महापौर रवि लांडगे यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यवसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते.

बैठकीत शहरात एमएनजीएल मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या लवकरात लवकर कशा देता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीनंतर एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एमएनजीएलच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत तातडीने कार्यवाही करून परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"