फक्त मुद्द्याचं!

9th March 2026
पिंपरी-चिंचवड

 पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी!

 पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी पक्षकार्य बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

viara vcc
viara vcc

नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिघी-गव्हाणेवस्ती-गवळीनगर मंडलाध्यक्षपदी प्रमोद परदेशी , चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्षपदी अजय साने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीबद्दल संजय पटनी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"