फक्त मुद्द्याचं!

7th March 2026
गुन्हेगारी

काँक्रीट मिक्सर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू!

काँक्रीट मिक्सर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू!

पिंपरी : जड वाहनांना बंदी असताना भरधाव वेगाने टाटा कंपनीचा काँक्रीट मिक्सर चालवूनन एका तरुणीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावली. ही घटना पाच मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवबा चौक, सुस -नांदे रोड ,मासे मार्केट समोर, सुसगाव येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत शंकर लक्ष्मण साळवे (वय 48, रा. नाना ससार यांचे घरात आझाद मित्र मंडळ शेजारी, प्रकाश नगर, सुसगाव, ता. मुळशी यांनी फिर्याद दिली आहे. अंजली शंकर साळवे (वय 18 )असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राजपाल संभाजी कसबे (वय 34, रा, बालाजी पेट्रोल पंपाजवळ, नांदे, ता. मुळशी), गणेश महातेश्वर कलशेट्टी (वय 43 , स. नं. नंबर 81, फ्लॅट नंबर 404, एफ विंग सूर्या कंट्रक्शन, दांगट इंडस्ट्रियल इस्टेट शिवणे )अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी अंजली शंकर साळवे (वय 18) ही होंडा डियो स्कुटी वरून सूस- नांदेड रोड ने राहते घरी येत असताना शिवबा चौक, सुस- नांदे रोड ,मासे मार्केट समोर सुसगाव) येथे नांदे गावचे दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या काँक्रीट मिक्सर ट्रक नंबर( एम. एच. 12/ आरएन / 7825 आरोपी क्रमांक एक याने स्कुटी गाडीला दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी असताना देखील जड वाहन चालवून आदेशाचा भंग केला आहे. या धडकेत दुचाकी स्वार तरुणी जबर जखमी झाली मात्र उपचार नंतर त्या मृत्युमुखी पडल्या. बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"