फक्त मुद्द्याचं!

7th March 2026
उद्योग

२०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३०% पर्यंत: संदिप बेलसरे

२०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३०% पर्यंत: संदिप बेलसरे

 पिंपरी : उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ जाहीर केले . राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचे एकूण उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे, ज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक क्लस्टरची स्थापना केली जाईल. उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ जाहीर केले गेले आहे, ज्यामुळे २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३०% पर्यंत वाढेल अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी दिली.

viara vcc
viara vcc

‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जातील. या धोरणामुळे सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी तसेच सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन केले जाईल. घोषणेचे स्वागत पण प्रभावी अंमलबजावणी व पुरवठा साखळीतल्या लघु व सुक्ष्म उद्योगांना याचा फायदा झाला पाहिजे असे बेलसरे यांनी सांगितले.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज दिले जाईल. इन्वेस्ट महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. तसेच राज्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतंत्र कमिशनर कार्यालय स्थापन केले जाईल. घोषणेचे स्वागत करताना खरच बँक व वित्तीय संस्था यांच्याकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध होईल याची जबाबदारी सरकारनी घेतली पाहिजे.सुक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र विभाग किंवा कमिशनर कार्यालय स्थापन केले तर त्यांचा जलद विकास होईल व त्यांची वार्षिक उलाढाल वाढेल व आर्थिक विकास होईल असे त्यांनी सांगितले.

स्टार्टअपसाठी महाफंड निर्माण करुन त्यांना वित्तीय कर्जपुरवठा सुलभ केला तर नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल व रोजगार निर्मिती होईल.असे ते म्हणाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"