फक्त मुद्द्याचं!

6th March 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद!

विविध विषयांवरील चित्रपट, लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन आणि तज्ज्ञांसोबत चर्चा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने तसेच पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या दुसऱ्या दिवशी आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात दिमाखात पार पडला. विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघुपट, माहितीपट प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात दुसऱ्या दिवशी देश-विदेशातील एकूण ४१ चित्रपटांचे प्रदर्शन झाले.

viara vcc
viara vcc

महोत्सवात दुसऱ्या दिवशी चित्रपट, लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन चित्रपट अशा विविध स्वरूपातील चित्रपटांचा समावेश होता. भारतासोबतच पोलंड, जपान, फ्रान्स, लेबनॉन, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांतील दिग्दर्शकांसाज चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर झाले. जगभरातील कथनशैली, दृष्टीकोन आणि संस्कृती एका छताखाली अनुभवण्याची संधी मिळाल्याने चित्रपट प्रेमी अधिक आनंददीत झाले.

याशिवाय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटांची विशेष स्क्रीनिंग घेण्यात आली. तरुण दिग्दर्शकांचे कल्पनाशीलता, तांत्रिक सूक्ष्मता आणि नव्या पिढीची चित्रभाषा प्रेक्षकांनी कौतुकाने अनुभवली. दिवसातील सर्व फिल्म स्क्रीनिंग्स प्रेक्षकांना कला, विचार आणि भावविश्वाचा समृद्ध अनुभव देणाऱ्या ठरल्या.

सिनेसृष्टीतील विविध अंगांवर तज्ज्ञांसोबत चर्चा
महोत्सवाच्या विशेष उपक्रमांतर्गत आज सिनेसृष्टीतील विविध अंगांवर आधारित खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले. चर्चेसाठी राकेश रावत (दिग्दर्शक/सिनेमॅटोग्राफर), वेद रवतानी (फिल्ममेकर), योगेश जाधव (दिग्दर्शक), विघ्नेश्वर राव (दाक्षिणात्य अभिनेता) आणि थन्मनम पुघाझेंधि (दिग्दर्शक) यांच्यासह अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. या चर्चेत सिनेसृष्टीतील सद्यःस्थिती, अभिनयातील भावविश्व, दिग्दर्शनातील वेगवेगळे दृष्टीकोन, कला विभागाची निर्मिती, कॅमेऱ्यामागील तांत्रिक पैलू, एडिटिंगमधील लय-गती, साऊंड डिझाइनचा सिनेमावर होणारा प्रभाव अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"