फक्त मुद्द्याचं!

2nd March 2026
पिंपरी-चिंचवड

ड प्रभागात महापालिकेची कारवाई; अनधिकृत १२ विद्युत पंप जप्त!

ड प्रभागात महापालिकेची कारवाई; अनधिकृत १२ विद्युत पंप जप्त!

पिंपळे निलख परिसरातील पाणीपुरवठा होणार सुरळीत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ड प्रभागात आज मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नळाला थेट पंप लावून अतिप्रमाणात पाणी खेचणाऱ्या सोसायट्यांमधील एकूण १२ अनाधिकृत पंप जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

viara vcc
viara vcc

पिंपळे निलख परिसरात आजपासून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाने अचानक पाहणी केली असता, काही ठिकाणी नळ कनेक्शनला अनधिकृतपणे दोन-दोन एचपी क्षमतेचे पंप बसवून थेट पाणी खेचले जात असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या पंपांच्या वापरामुळे परिसरात कमी दाबाने पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तसेच, पंपामुळे घाण पाणी नळामध्ये येण्याच्या तक्रारीही नागरिकांकडून प्राप्त होत होत्या.

महापालिकेच्या या कारवाईत कनिष्ठ अभियंता प्रियांका शिंदे व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईसाठी कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उप अभियंता प्रवीण धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, नागरिकांना समान व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी अशा प्रकारची कारवाई पुढील काळात इतर प्रभागांमध्येही राबविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी अनधिकृत पंप वापरू नयेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"