फक्त मुद्द्याचं!

13th April 2026
पिंपरी-चिंचवड

नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा संपन्न!

नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा संपन्न!

स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा  शुक्रवारी पार पडली. पहिल्याच सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी कामकाजातील सहभाग दाखवून दिला आहे. महापालिका स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते

vcc 5
vcc 5


स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड
या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली.
स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून पक्षाकडून अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबा त्रिभुवन आणि शितल वर्णेकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची निवड जाहीर करण्यात आली.

निवड झालेल्या सर्व समिती सदस्यांचा पिठासीन अधिकारी तथा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

विधी समिती
ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम (भारतीय जनता पार्टी)
शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

शहर सुधारणा समिती
अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे (भारतीय जनता पार्टी)
डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे (भारतीय जनता पार्टी)
भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

शिक्षण समिती
पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे (भारतीय जनता पार्टी)
प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

महिला व बालकल्याण समिती
पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे (भारतीय जनता पार्टी)
निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"