फक्त मुद्द्याचं!

14th February 2026
पिंपरी-चिंचवड

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार झोपडपट्टी सेवाकर!

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार झोपडपट्टी सेवाकर!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टी सेवाकर वसुलीची मोहीम सुरू असून, नागरिकांच्या सोयीसाठी विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली करदात्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने झोपडपट्टी सेवाकर भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील झोपडपट्टी सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवाकर बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस देण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून डिजिटल पद्धतीने कर भरण्यास चालना मिळणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"