फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
अध्यात्म

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे आयोजन!

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे आयोजन!

१७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदानावर सादरीकरण…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांचे, पराक्रमाचे आणि सुशासनाच्या तत्त्वांचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

या पर्वाअंतर्गत निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मा. राष्ट्रपती महोदय यांच्या समोर सादर झालेल्या या भव्य महानाट्यप्रयोगामध्ये सुमारे २५० हून अधिक कलाकारांचा सहभाग असून घोडे,उंट तसेच आकर्षक नेपथ्य,नेत्रदीपक अतिषबाजी, प्रकाशयोजना व ध्वनीसंयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात येणार आहेत.महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महानाट्याचा शुभारंभ होणार आहे.

‘शिवगर्जना’ या महानाट्यात शिवाजी महाराज यांच्या जन्माआधीचा काल, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट (भक्ती शक्ती भेट), तोरणा विजय,स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, शेतकऱ्यांसाठीचे आज्ञापत्र, प्रतापगड मोहीम, पन्हाळगड वेढा आणि सुटका, स्वराज्य आरमार उभारणीचा प्रसंग, पुरंदरचा तह, आग्रा भेट, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग आणि नेत्र सुखद करणारा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे ऐतिहासिक प्रसंग सजीव स्वरूपात सादर केले जाणार आहेत. इतिहासाची भव्यता आणि राष्ट्राभिमान जागविणारा हा नाट्यप्रयोग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कर्तृत्व हे प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून शिवरायांचे जीवनकार्य आणि स्वराज्याचा संदेश शहरवासियांपर्यंत पोहोचविणे हा हेतू असून ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा लाभ नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून घ्यावा आणि शिवरायांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी. – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"