टाटा मोटर्स अ व टाटा टेक्नॉलॉजीज संघाचा अंतीम फेरीत प्रवेश!

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी मर्यादित २० षटकांची क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या मर्यादित २० षटकांच्या स्पर्धेत दिनांक ११ फेब्रुवारी २०२६,बुधवारी टाटा मोटर्स अ व टाटा टेक्नॉलॉजीज संघाने अनुक्रमे एमक्यूअर फार्मासिटिकलस व भारत फोर्ज यावर विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६,टाटा मोटर्स क्रीडांगणावर होईल.

१)सकाळचे सत्र:- सकाळच्या सत्रात टाटा मोटर्स क्रीडांगणावर टाटा मोटर्स अ संघ विरुद्ध एमक्युअर फार्मासिटिकल्स संघ यात झालेल्या सामन्यात टाटा मोटर्स अ संघ ६८ धावांनी विजयी झाला. त्यांचा पंकज वाकचौरे सामनावीर ठरला.
टाटा मोटर्स अ संघ २० षटके ६ बाद १९८ धावा :- प्रवीण कांबळे ५१ मनोज जराड २३ पंकज वाकचौरे ७५ अमोल कायगुडे ३० महेश बांदल १३-३
एमक्युअर फार्मासिटिकल्स १६.५ षटके सर्व बाद १३० धावा :- रितेश धाडवे ३७ रुतव मेहता २९ शाहबाज सय्यद २० कैलास डांगे २९-४ सुशील बेंद्रे १५-३
२)दुपारचे सत्र:- दुपारच्या सत्रात टाटा मोटर्स क्रीडांगणावर भारत फोर्ज विरुद्ध टाटा टेक्नॉलॉजीज यात झालेल्या सामन्यांमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज संघ ७ गडी राखून विजयी झाला. या सामन्याचा सामनावीर अनिल गजिनकर ठरला
भारत फोर्ज १४.४ षटके सर्व बाद ७४ धावा:- प्रशांत बांगर १७ अनिल गजिनकर ९-५
टाटा टेक्नॉलॉजीज १३.१ षटके ३ बाद ७८ धावा:- स्वप्नील मुंगेल ३९ अक्षय ताम्हाणे १७

