पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिन’ साजरा!

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि ‘समर्पण दिन’ भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शर्मिलाताई बाबर यांनी पंडितजींच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या महान कार्यावर आपले विचार व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खडतर जीवनप्रवास, भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान आणि समाजातील शेवटच्या घटकाविषयी त्यांना वाटणारी आस्था, यावर देशपांडे यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे वैशालीताई खाडे, नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सीए आघाडी अध्यक्ष बबनराव डांगले, व्यापारी आघाडीचे सतपाल गोयल, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, गणेश वाळुंजकर, सुधीर निर्बीकर, प्रसाद दिवाळीलीकर, प्रकाश सोळंकी, किशोर पवार, अशोक शुभेदार, प्रकाश बंब, रमेश पुजारी, रविंद्र सानप, सुभाष सिंगल, गोविंद सिंदे, अभिजित रॉय, शरद पेद्दी आणि संजय परळीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी केले.

