आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना शिलाई मशीन वाटप!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड: महिला सक्षमीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीचा विषय आहे. जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगतीपथावर जातो. प्रभाग क्रमांक १० मधील भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक १० मध्ये आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नांतून आयोजित ‘मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व किट वाटप’ सोहळा काल दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे परिसरातील ४०० गरजू महिलांना प्रशिक्षणांनंतर प्रत्यक्ष शिलाई मशीन किटचे वाटप करण्यात आले.
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून अजितदानांना श्रद्धांजली अर्पण केली.

