छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती; बुधवार४ फेब्रुवारी रोजी समन्वय बैठक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात,तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात येते.

यावर्षी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जयंती व प्रबोधन पर्व साजरे करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

