फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या कबड्डी स्पर्धेत टाटा मोटर्स”अ”, संघ विजयी!

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या कबड्डी स्पर्धेत टाटा मोटर्स”अ”, संघ विजयी!

महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनी आयोजित कबड्डी स्पर्धा
पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या या स्पर्धेला खेळाडूंचा मिळालेला प्रतिसाद व प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत उत्साहवर्धक असून कबड्डी खेळ शारीरिक व मानसिक दोन्ही स्थितीला मजबूत करणारा आहे असे मत स्पर्धेचे पारितोषिक वितरणावेळी बोलताना वासिम पिरजादे (पीआर मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा) यांनी व्यक्त केले. महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत टाटा मोटर्स”अ”,विजयी झाला.

viara vcc
viara vcc

औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनी आयोजित श्री शिवाजी उदय मंडळाच्या क्रीडांगणावर सुरू असलेली औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी कबड्डी स्पर्धा आज दिनांक ३१ जानेवारी १२०२६ शनिवार रोजी संपन्न झाली.या स्पर्धेत टाटा मोटर्स”अ”,टाटा मोटर्स “ब”,एसकेएफ,जेसीबी,बजाज ऑटो वाळुंज,बजाज ऑटो चाकण,बजाज ऑटो आकुर्डी, महिंद्रा अँड महिंद्रा “अ”, महिंद्रा अँड महिंद्रा “ब”, ॲमुनिशन फॅक्टरी पीसीएमसी फायर डिपार्टमेंट अशा एकूण ११ संघाचा सहभाग होता.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण वासिम पिरजादे (पीआर मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा), नितीन कदम (स्पोर्ट्स ऑफिसर टाटा मोटर्स) सागर लोंढे (पृथ्वी ग्रुप), दिनेश भुजबळ, बापू सावंत, किरण देसाई, गणेश दिनकर, भगवान दात्रक (महेंद्रा अँड महेंद्रा स्पोर्ट्स कमिटी) औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम , वसंत ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदीप वाघ, दयानंद नरवडे (एचआर मॅनेजर जेसीबी )किशोर भोर (जनरल सेक्रेटरी जेसीबी युनियन), संतोष शिंदे (एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी) राहुल कापसे (प्राज इंडस्ट्रीज स्पोर्ट्स कमिटी),मंदार कुलकर्णी (उत्कर्ष क्रीडा अकॅडमी) हे यावेळी उपस्थित होते.

सामन्याचे उपांत्य व अंतिम फेरीचे निकाल
1) उपांत्य फेरी:- बजाज ऑटो आकुर्डी विरुद्ध जेसीबी यात झालेल्या सामन्यात बजाज ऑटो आकुर्डी संघ ३३-३१गुणांनी विजयी झाला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. क्षणोक्षणाला जय विजयाचे पारडं दोन्ही बाजूला झुकत होतं.
2) उपांत्य फेरी :-टाटा मोटर्स”अ”, विरुद्ध पीसीएमसी (फायर डिपार्टमेंट ) यात झालेल्या सामन्यात टाटा मोटर्स “अ”, संघ ४३ विरुद्ध २४ गुणांनी विजयी झाला.
3) अंतिम फेरी :- अंतिम सामन्यात बजाज ऑटो आकुर्डी विरुद्ध टाटा मोटर्स”अ”, यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात टाटा मोटर्स अ, ३ गुणांनी विजयी झाला. नेत्रदीपक पकडी ,खोलवर केलेल्या चढया, ऐन मोक्याच्या क्षणाला घेतलेली हनुमान उडी या सर्व गोष्टींनी हा सामना गाजला. { टाटा मोटर्स “अ”,विरुद्ध बजाज ऑटो आकुर्डी (३३-३0) }

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन श्री शिवाजी उदय मंडळाचे रुपेश दळवी, प्रसाद टोणपेकर, राहुल कापसे, सचिन कांबळे दिनेश भुजबळ यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ ,प्रास्ताविक नरेंद्र कदम व आभार प्रदर्शन सचिव वसंत ठोंबरे यांनी केले. पारितोषिक वितरणाच्या वेळी विजेत्या व उपविजेत्या संघांना सर्टिफिकेट व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी खेळाडूंना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषकेही देण्यात आली. उत्कृष्ट चढाई शुभम पाटील (जेसीबी) उत्कृष्ट पकड राहुल पाटील (बजाज ऑटो आकुर्डी) उत्कृष्ट अष्टपैलू अर्जुन वागरे (टाटा मोटर्स “अ”,)यांना मिळाले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रकाश गाडे, किरण लंके,शरद खुपटे हरिभाऊ धुमाळ, पद्माकर घोगरे, राजेंद्र विश्वासराव यांनी काम पाहिले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"