फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथम प्रतिनिधित्व करणारे 50% सदस्य!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथम प्रतिनिधित्व करणारे 50% सदस्य!

भाजपच्या प्रथम नगरसेवकांची संख्या सुमारे 39
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महापालिकेचे प्रथमच प्रतिनिधित्व करणारे एकूण 62 सदस्य आहेत . त्यामुळे महापालिकेत प्रथम प्रतिनिधित्व करत असलेली सदस्य संख्या सुमारे 50% आहे .

viara vcc
viara vcc

महापालिका निवडणुकीत आरक्षणाचा ताळमेळ न बसल्याने अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवता आली नाही .त्यामुळे आपली पत्नी, आई,बहिण, सुनांना संधी मिळाली आहे. त्यातच होलसेल पक्षप्रवेश झाल्याने अनेकांना आपली संधी गमवावे लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जादा इच्छुक उमेदवार असल्याने अनेककांना संधी नाकारण्यात आली .त्यामुळे महापालिका प्रतिनिधित्व करण्याची संधी नवीन उमेदवारांना उपलब्ध झाली .भारतीय जनता पक्षाकडून अर्चना सस्ते, सुजाता बोराटे, सोनम मोरे, निखिल बोराडे, सारिका गायकवाड, सचिन तापकीर, कविता भोंगाळे, रेखा देवकर ,राजश्री लांडगे ,योगेश लांडगे, राणी पठारे, डॉक्टर सुहास कांबळे, सुप्रिया चांदगुडे ,कुशाग्र कदम, रिटा सानप, निलेश नेवाळे, शितल वर्णेकर, शिवाजी नरळे ,अनिल घोलप, अर्चना कारंडे, कैलास कुटे, पल्लवी वाल्हेकर, मनीषा चिंचवडे, मधुरा शिंदे, मंदार देशपांडे, कोमल काळे, शालिनी गुजर (भाजप पुरस्कृत), रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर ,स्नेहा कलाटे, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, रवीना अंगोळकर, श्याम जगताप, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे असे भाजपचे प्रथम नगरसेवक आहेत त्यांची संख्या सुमारे 39 आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास साने,यश साने, विराज लांडे, अश्विनी वाबळे, तुषार सहाणे, सिद्धार्थ बनसोडे, सारिका मासुळकर, अरुणा लंगोटे, सविता आसवानी, मनीषा लांडे, वर्षा जगताप, प्रियंका कुदळे, तानाजी बारणे, योगिता बारणे, सागर कोकणे, प्रतीक्षा लांघी जवळकर, दीप्ती कांबळे असे एकूण नवनिर्वाचित 17 नगरसेवक प्रथमच महापालिकेत प्रतिनिधित्व करणार आहेत. शिवसेनेचे विश्वजीत वारणे, निलेश तरस, रेश्मा कातळे ,ऐश्वर्या तरस हे चार जण प्रथमच प्रतिनिधित्व करत आहेत. भाजप आरपीआय युतीचे कुणाल वाव्हळकर, धर्मराज तंतरपाळे हे दोघेजण पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत आहेत. असे एकूण 62 जण प्रथमच महापालिकेत प्रतिनिधित्व करत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"