फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का ; सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का ; सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा गटावर ‘‘ सर्जिकल स्ट्राईक’’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आज सर्वपक्षीय 22 दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला.

viara vcc
viara vcc

महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. शहरात राजकीय दिवाळी सुरू झाली असून, अजित पवारांनी वाजवल्या ‘टिकल्या’; तर महेश लांडगेंनी ‘सुतळी बॉम्ब’ लावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक ‘‘पिंपरी-चिंचवडचा दादा विरुद्ध बारामतीचा दादा’’ अशी होणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदवले आहे.

विशेष म्हणजे, प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पक्षश्रेष्ठींकडे विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळात शहरातील निर्णय शहरात होतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून राष्ट्रवादीला अक्षरश: घायाळ केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मोठा ‘सपोर्ट’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी
१) माजी महापौर उबाठा गटाचे नेते – संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – प्रशांत शितोळे
४) नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष
५) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – विनोद नढे
६) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – प्रभाकर वाघेरे
७)माजी उपमहापौर – राजू मिसाळ
८) उबाठा गटाचे नगरसेवक – अमित गावडे
९)  उबाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव
१०) रवी लांडगे
११) माजी नगरसेवक – संजय नाना काटे
१२) प्रविण भालेकर
१३) जालिंदर बापु शिंदे
१४) सचिन सानप (स्वतः व पत्नी)
१५) दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
१६) सदगुरु कदम
१७) समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)
१८) डॉ. श्री सुहास कांबळे
१९) कुशाग्र कदम
२०) अशोक मगर
२१) नागेश गवळी
२२) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी
२३) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025-26 च्या निमित्त शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली आणि प्रदेशाध्यक्ष . रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. सर्व पिंपरी-चिंचवडकर मान्यवरांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत करतो. देव-देश-धर्म अन्‌ संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये ’’विकासाभिमूख हिंदुत्वाच्या’’ पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"