फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

रोजगार मेळाव्यात  १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध!

रोजगार मेळाव्यात  १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध!

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित रोजगार मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

viara vcc
viara vcc

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांचा समावेश होता.

या मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा ते ग्रॅज्युएट अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुलाखतीच्या माध्यमातून कंपन्यांनी विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही दिले.

महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदींनी मेळाव्याला भेट दिली.

दरम्यान, डेटा विश्लेषण करून त्या आधारे नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून सीएचडीसी प्रकल्प कार्यरत असून त्या अंतर्गत या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"