बारणे क्रिकेट अकॅडमीची विजयी घोडदौड !

स्पार्क क्रिकेट अकॅडमीचे ध्रुवील रायताथा १०३ शतक वाया
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेल्या “पिंपरी-चिंचवड क्रिकेट करंडक” मर्यादित २० षटकांच्या खुल्या गटाच्या आंतर क्रिकेट क्लब सामन्यात बारणे क्रिकेट अकॅडमीची विजयी घोडदौड सुरु आहे.

स्पार्क अकॅडमी विरुद्ध बारणे क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यामध्ये बारणे क्रिकेट अकॅडमी दोन गडी राखून विजयी झाले. या सामन्यात पृथ्वी सिंग सामनावीर ठरला. या सामन्यामध्ये ध्रुवील रायता था याने शतक झळकावले.
संक्षिप्त धावफलक
स्पार्क क्रिकेट अकॅडमी १९६ धावा ५ बाद २० षटके:- शंतनू फते २७, ध्रुवील रायताथा १०३, पृथ्वी सिंग ३०/४.
बारणे क्रिकेट अकॅडमी १९८ धावा ८ बाद १९.१ षटके:- वेदांत हंचे ५३, पृथ्वी सिंग ५५, संभाजी शिंदे १८, सोहम मोहिते २०/२, पियुष इंगवले १६/२. पृथ्वी सिंग सामनावीर(बारणे क्रिकेट अकॅडमी )
एसजेएसएफ( रेड) विरुद्ध बारणे क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यांमध्ये बारणे क्रिकेट अकॅडमी ३ गडी राखून विजयी झाली. या सामन्यात प्रतीक खोल्लम (बारणे क्रिकेट अकॅडमी )सामनावीर ठरला.
एसजेएसएफ १६३ धावा ९ बाद २० षटके:- अथर्व वाव्हळ ४०, आरुष सिंग १८ चैतन्य कोंडभर २९ शिवम चौबे २५ गौरव जोत्शी १६/३
बारणे क्रिकेट अकॅडमी १६७ धावा ७ बाद १९.४ षटके:-रंजीत मगर २०,ऋषी बारणे ३३, श्रीराज सूर्यवंशी १९, प्रतीक खोल्लम ५८, दक्ष खेमचंदानी ३५/३, अमन सिंग १०/२

