निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; सुधारित मतदार याद्या कार्यक्रम जाहीर!

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि दुबार मतदारांची संख्या
पिंपरी : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि दुबार मतदारांची संख्या असल्याने आता नव्याने मतदार प्रारूप याद्या तयार करण्यात येणार आहेत . सुधारित मतदार याद्या कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. अंतिम मतदार यादी पाच डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल ही मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर दबाव आणला होता राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे .
त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर ऐवजी तीन डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे . प्रारूप मतदार यादी वरील दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर असेल . मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर असणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख सहा नोव्हेंबर ठरली होती त्यानंतर ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारूप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता .त्यानुसार नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावे असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे . दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने आता वेळही मागितला आहे . मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दुबार नावाबाबत आवाज उठवला होता . पिंपरी चिंचवड महापालिकेतील मतदार यादीमध्येही मोठ्या प्रमाणावर घोळ आणि गोंधळ असल्याचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहत यांनी आरोप केला होता. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून हा गोंधळ संपवण्यासाठी हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शत्रुघन काटे यांनी देखील मतदार यादीतील घोळ आणि गोंधळाबाबत नाराजी व्यक्त करून मुदतवाढ मागितली होती . दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता नव्याने मतदार प्रारूप याद्या तयार करण्यात येणार आहेत .
सुधारित मतदार याद्या कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. अंतिम मतदार यादी पाच डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. ही मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर दबाव आणला होता .राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर ऐवजी तीन डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी वरील दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर असेल .मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर असणार आहे .महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख सहा नोव्हेंबर ठरली होती त्यानंतर ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारूप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता


