फक्त मुद्द्याचं!

14th June 2026
पिंपरी-चिंचवड

प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी दूर करण्याची  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी!

प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी दूर करण्याची  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी!

 प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनात सावळा गोंधळ
पिंपरी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुक आयोगोकडे केली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यशक्ष योगेश बहत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

viara vcc
viara vcc

 पत्रकार परिषदेस शहर समन्वयक विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मंगलाताई कदम, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, उल्हास शेट्टी, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, श्रीधर वाल्हेकर, विनायक रणसुभे आधी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत, विशेषतः विभाजनामध्ये, मोठ्या प्रमाणावर झालेल्या गोंधळाकडे र्यांनी लक्ष वेधले. आदेशात स्पष्ट निर्देश दिलेले असूनही, प्रत्यक्ष अंमलबजावणीत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन आणि मतदार यादीतील गोंधळ. आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, प्रभागाच्या हद्दीवर राहणाऱ्या मतदारांच्या संदर्भात विशेष दक्षता घेणे आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार स्थळ निरीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही शाहनिशा न करताच संपूर्ण यादी भाग किंवा परिसर परस्पर मूळ प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रभागांत ५ हजार पेक्षा जास्त मतदारांचा घोळ झाला आहे. मतदार याद्यांचे विभाजन करताना स्थळ पाहणीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

.मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे, हे ऑनलाईन , ॲपद्वारे शोधण्याची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदारांना आपले नाव शोधणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे. मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF स्वरूपातील याद्यांमध्ये ‘सर्चिंग’ (Searching) सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे मतदारांना मॅन्युअली (Manual) नाव शोधावे लागत आहे. PDF याद्यांमध्ये मतदारांचे फोटो उपलब्ध नाहीत, ज्यामुळे एकाच नावाच्या दोन मतदारांबाबत अधिक गोंधळ निर्माण होत आहे असे बहल म्हणाले.

एकाच परिसरातील २०० ते ३०० नावे चुकीच्या पद्धतीने विभाजित झाली आहेत, अशा सामूहिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर, प्रशासनाकडून Suo-Moto कार्यवाही करण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे.

.प्रारूप मतदारयाद्यांमध्ये दुबार व तिबार नोंद असलेल्या मतदारांची संख्या तब्बल एक लाखापेक्षा जास्त आहेत. तसेच आपल्या मार्फत सुमारे 92 हजार दुबार नावांची यादी महानगरपालिकेकडे देण्यात आलेली आहे तसेच आम्ही देखील शहरांतर्गत असलेली सुमारे १२. हजार दुबार तिबार नावे पुराव्यासह महानगरपालिका निवडणूक विभागाकडे सादर केलेली आहे. परंतु आम्ही सादर केलेल्या आणि आपण दिलेल्या दुबार मतदारांबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीअसा आरोप त्यानी केला.

प्रसंगवश्यात उपोक्त गंभीर त्रुटी तातडीने दूर करून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक राबवण्यासाठी .मतदाराला आपले नाव ऑनलाईन , ॲपवर त्याच्या नाव, पत्ता किंवा मतदान ओळखपत्र क्रमांकावरून त्वरित शोधता येईल, अशी युजर-फ्रेंडली सर्च सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी बहल यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"