परंडवाल क्रिकेट अकॅडमी व आर टी फायटर्स इलेव्हन संघाचे विजय!

पिंपरी चिंचवड करंडक;T- 20 आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन मार्फत आयोजित केलेल्या ओपन T- 20 पिंपरी चिंचवड करंडक आतर क्लब क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यांमध्ये परंडवाल क्रिकेट अकॅडमी व आर टी फायटर्स इलेव्हन संघाने विजय मिळवले.

आर टी फायटर्स इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना पंधरा षटकात ६ बाद १५९ धावा केल्या .आर र्टी फायटर्स इलेव्हन संघाकडून साहीस शिंदे यांनी सुरेख फलंदाजी करत ७७ धावा केल्या .तर विवेक टिपरे यांनी २२ पार्थ पाटील यांनी २३धावा केल्या तर एस एस ए वन संघाकडून श्रेयस आंबील ढगे यांनी 32 धावा दोन फलंदाज बाद केले. एस एस ए वन संघाने १५ पटकात ६ बात ९३ धावा फक्त करू शकला. आर टी फायटरस इलेवन संघाने एस एस वन संघावर 66 धावांनी विजय मिळविला.
दुसऱ्या झालेल्या सामन्यांमध्ये एस जे एफ ए (यलो) संघाने २० षटकात ८ बाद १३३ धावा केल्या .यामध्ये रुद्र पटेल १८ केतन गायकवाड १० येशिले कुचाळ ५६ धावा केल्या. खामनकर यांनी १२धावा २ गडी बाद केले तर परंडवाल क्रिकेट अकॅडमी ने १५.१ षटकात तीन बाद १३७ धावा केल्या यामध्ये शुभम शेलार यांनी ५३ स्नेहल खामनकर यांनी ४१ धावा केल्या सचिन सावंत यांनी १८ धावात १ गडी बाद केला व गणेश अंकुश येणे २७ धावात १ गडी बाद केला.
धावफलक
आरटी फायटर्स इलेवन* १५ षटकात ६ बाद १५९ साईस शिंदे ७७विवेक टिपरे 22 पारथ पाटील श्रेयस अंबिलढगे २/32 विजयी विरुद्ध
एस एस ए वन* १५ षटकात ६ बाद 93धावा
श्रेयस अंबिलढगे २२ओम वड्राईकर २५ शैलेश प्रजापती २/३४ साई शिंदे २/२१
दुसरा सामनात एस जे एस एफ (यलो) २०षटकात ८ बाद १३३ रुद्र पटेल १८, केतन गायकवाड १०, येशीले कुचाळ ५६, स्नेहल खामनकर २/१२, कुंदन कुमार १/२६ पराभूत विरुद्ध
परंडवाल क्रिकेट ॲकॅडमी १५.१ षटकात३ बाद १३७धावा
शुभम शेलार ५३ ,स्नेहल खामकर४१ ,शुभम उड्डाणडाळी १९, सचिन सावंत एक, गणेश अंकुशे १/२७.

