खेळाचे क्षेत्र विस्तारित याचा लाभ खेळाडूंनी उचलावा: प्रकाश जावळे

औद्योगिक क्रीडा ६२वी कॅरम स्पर्धा
पिंपरी : या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड व चाकण एमआयडीसी मधील खेळाडूंचा मोठा सहभाग आहे. औद्योगिक क्रीडा संघटनेच्या खेळाचे क्षेत्र विस्तारित आहे.याचा लाभ खेळाडूंनी उचलावा असे मत बजाज ऑटो कंपनीतील माजी वरिष्ठ अधिकारी प्रकाश जावळे यांनी औद्योगिक क्रीडा कॅरम स्पर्धा पारितोषिक वितरणाच्या वेळी व्यक्त केले.
औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२वी कॅरम स्पर्धा एसकेएफ बेअरिंग इंडिया एम्प्लॉइज युनियन हॉल ,चिंचवड येथे संपन्न झाली. सदर स्पर्धा एसकेएफ इंडिया,चिंचवड यांनी आयोजित केली .
पारितोषिक वितरणच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी तर संस्थेच्या वाटचालीविषयी नरेंद्र कदम यांनी सर्वांना माहिती दिली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण बजाज ऑटो कंपनीतील माजी वरिष्ठ अधिकारी प्रकाश जावळे व फूड कॉर्पोरेशन, मुंबई येथील माजी वरिष्ठ सरव्यवस्थापक नामदेव मांडेकर यांच्या हस्ते झाले; याप्रसंगी बोलताना प्रकाश जावळे म्हणाले की तर किशोर कदम म्हणाले की औद्योगिक क्रीडा संघटना खेळाच्या स्पर्धेत पुरुष खेळाडूंच्या बरोबर महिलांचाही सहभाग मोठा आहे हे पाहून मला आनंद वाटतो. खेळाडूंना स्पर्धेविषयी मार्गदर्शन सचिव वसंत ठोंबरे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी केले.

या स्पर्धेमध्ये पीसीएमसी,व्हॉल्यूमॅप,ऑर्डिनन्स,बजाज ऑटो आकुर्डी,चाकण,एसकेएफ,एयूओ मोबिलीटी, जेसीबी इंडिया, प्राज इंडस्ट्रीज,ॲटलास कॉपको,विलो, सीमंडस मार्शल,सीआयई,महिंद्रा अँड महिंद्रा,सँडविक इंडिया,डीआरडीओ,अम्युनिशन फॅक्टरी,तुषार इंटरप्राइस,भारत फोर्ज,इन्फोसिस,इटॉन इंडिया,टेट्रापॅक,जेएसएटी,मिंडा कॉर्पोरेशन,टीकेआईएल,महिंद्रा अँड महिंद्रा चाकण,टाटा मोटर्स,इएसव्हीइइ,फिनट्यूब्स, थरमॅक्स,टेक महिंद्रा,हिताची अस्टेमो,कॅपस्टोन,फॉर्विया,इमर्सन,महिंद्रा लॉजिस्टिक्स,आरजीसी,मर्सिडीज, हिताची,अद्विक हायटेक या ४० कंपन्यांच्या २४८, पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा ४(एकेरी व दुहेरी पुरुष,एकेरी व दुहेरी महिला)गटामध्ये झाली.
याप्रसंगी औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे,उपाध्यक्ष नरेंद्र कदम,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,खजिनदार प्रदीप वाघ,विजय हिंगे, मंदार कुलकर्णी,अतुल काळोखे(बजाज ऑटो आकुर्डी,ॲडमिन मॅनेजर),नितीन कदम(टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी),दयानंद नरवडे (जेसीबी एचआर मॅनेजर),दत्ता गायकवाड(सिनीयर एचआर मॅनेजर,महिंद्रा अँड महिंद्रा),राहुल कापसे(प्राज इंडस्ट्रीज स्पोर्ट्स कमिटी),सचिन कांबळे(जेसीबी स्पोर्ट्स कमिटी),अभय तळदेवकर(सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटी),किरण कंक,संतोष शिंदे,मेनिनो कार्डोझ(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी), ज्येष्ठ खेळाडू व आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम हेही उपस्थित होते.पारितोषिक वितरणाशेवटी हरी देशपांडे यांनी आभार मानले.या स्पर्धेसाठी YouTube प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी खेळाडूंच्यातर्फे रावसाहेब कानवडे यांनी आयोजकांचे आभार मानले स्पर्धेसाठी जनार्दन कॅरम हाऊसचे प्रदीप बारटके,महेश साळी(चीफ रेफ्री),रोहित कदम यांचे साह्य लाभले.
अंतिम फेरीचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
२) पुरुष दुहेरी :-उपांत्य फेरी
१)शशी गायकवाड+मनोज भोसले(टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध प्रीतम कटके+शैलेश ढवळे(अम्युनेशन फॅक्टरी)(१४-१२),(१६-५)
२)सचिन बांदल+संजय थिटे (टाटा मोटर्स) पराभूत विरुद्ध अनंत भूते+संजय सारसर (पीसीएमसी) (२२-१३),(११-१८),(१३-१४)
३) पुरुष दुहेरी:- अंतिम फेरी
शशी गायकवाड+मनोज भोसले (टाटा मोटर्स) पराभूत विरुद्ध अनंत भूते+सुरज सारसर पीसीएमसी,(१३-१७),(०-१८)
अंतिम फेरीत (पुरुष दुहेरी) अनंत भूते व सुरज सारसर पीसीएमसी या जोडीने शशी गायकवाड व मनोज भोसले या टाटा मोटर्सच्या जोडीवर विजय मिळवून या स्पर्धेचे दुहेरी पुरुष गटाचे अजिंक्यपद पटकावले.
३)अंतिम फेरी
संजय थिटे(टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध श्रावण तलाठी (सीमंड्स मार्शल)(१८-६)(१३-८)
पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये संजय थिटे टाटा मोटर्स याने श्रावण तलाठी सिमेंट मार्शल याचा पराभव करून पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
१)महिला एकेरी :-उपांत्य फेरी
१)निशा पाटील (टेट्रापॅक )विजयी विरुद्ध अक्षता जाधव ( फॉरविया),२३-०.
२)अंदल अमृतवंशिनी (बजाज ऑटो आकुर्डी) पराभूत विरुद्ध स्मिता घाग(सँडविक एशिया) (१-१४)
२)महिला एकेरी:-अंतिम फेरी
निशा पाटील (टेट्रापॅक) विजयी विरुद्ध स्मिता घाग (सँडविक इंडिया) (१५-६).
महिला एकेरीचे विजेतेपद टेट्रापॅकच्या निशा पाटीलने पटकाविले तर उपविजेतेपद सँडविक एशियाच्या स्मिता घाग यांना मिळाले.
२)महिला दुहेरी:-उपांत्य फेरी
१)अर्पिता डाके व मिता पडनाड (प्राज इंडस्ट्रीज) विजयी विरुद्ध मनिषा खेडेकर व शीतल डाके (पीसीएमसी) (११-४)
२)श्रुतिका जाधव व सुकन्या भावसार (प्राज इंडस्ट्रीज) विजयी विरुद्ध कल्याणी शेलार व जुही विश्वकर्मा (एसकेएफ) (४-०)
३)अंतिम फेरी
अर्पिता डाके व मिता पडनाड (प्राज इंडस्ट्रीज) विजयी विरुद्ध श्रुतिका जाधव व सुकन्या भावसार ( प्राज इंडस्ट्रीज) (७-०).
दुहेरी महिला गटातील विजेतेपद अर्पिता डाके व मिता पडनाड (प्राज इंडस्ट्रीज) व उपविजेतेपद श्रुतिका जाधव व सुकन्या भावसार (प्राज इंडस्ट्रीज) यांनी मिळविले.

