बारणे क्रिकेट अकॅडमी व स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी संघाचे विजय!

पिंपरी चिंचवड करंडक क्रिकेट स्पर्धा; हर्षल हाडके सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोशियाने फोर स्टार मैदानावर आयोजित केलेल्या पिंपरी चिंचवड करंडक क्रिकेट स्पर्धेत बारणे क्रिकेट अकॅडमी व स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी संघाने विजय मिळवले.

प्रथम फलंदाजी करताना जी के इलेवन संघाने २० षटकात६ बाद १८१ धावा केल्या यामध्ये गणेश कलाल यांनी नाबाद ६९धावा तर सागर नाममुळे ३० धावा तर ओंकार यादव याने २५धावा केल्या तर बारणे क्रिकेट अकॅडमी संघाने १६.२षटकात २बाद १८५ धावा केल्या यामध्ये हर्षल हाडके यांनी नाबाद ९९ धावाची खेळी केली तर श्रेयस जाधव याने ६९ धावा केल्या दुसऱ्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी संघाने २०षटकात ७ बाद १६८ धावा केल्या यामध्ये आदित्य घोगरे ६१ मेहर नरवडे ६७ धावा केल्या तर यशव्वी क्रिकेट संघाने १८.२षटकात सर्व बाद १२७धावा केल्या यामध्ये अरनेश रॉय ४१ विजय कोतवाल १८ शाकिब शेख १४ धावा केल्या .
धावफलक :- जी. के इलेवनच , २० षटकात ६ बाद १८१ धावा
गणेश कलाल नाबाद६९ सागर नाम मुळे 30 प्रशनुमनआटपाट १५ पृथ्वी सिंग २/ २१ हर्षल हाडके १/२३ पराभूत विरुद्ध
बारणे क्रिकेट अकॅडमी १६.२षटकात २ बाद १८५ धावा हर्षल हाडके नाबाद ९९ श्रेयस जाधव ६९ गणेश कलाल २/२५
दुसऱ्या झालेल्या क्रिकेट सामन्यात स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी , २० षटकात ७बाद १६८ धावा
आदित्य घोगरे ६१ मेहर नरवडे ६७ साकिब २/२६ विजयी विरुद्ध
यशव्वी क्रिकेट क्लब
सर्व बाद १२७ धावा १८.२षटकात अरनेश राय ४१ विजय कोतवाल १८ करण उपाध्याय २/३० अद्वैत कृष्णा २/३१ मिथेश धमानी ४/१६.

