राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून १४ नोव्हेंबर पासून इच्छुकांकडून मागविले उमेदवारी अर्ज !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने ३२ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १०:०० ते सांयकाळी ०५:००* या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे संपूर्ण माहितीसह अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावेत आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस , शहराध्यक्ष योगेश बहल यांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे.

अर्जासोबत उमेदवारांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपुर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक इत्यादींसह आपला कार्य अहवाल जोडने आवश्यक आहे.

