फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
पिंपरी-चिंचवड

दिवाळीतून महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांना मिळाला रोजगार!

दिवाळीतून महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांना मिळाला रोजगार!

१७ ठिकाणच्या प्रदर्शनांना नागरिकांचा प्रतिसाद
पिंपरी : महापालिकेच्या “सक्षमा” प्रकल्पांतर्गत दिवाळी काळात फराळ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या १७ ठिकाणी प्रदर्शने भरवली होती. या प्रदर्शनांमध्ये शहरातील १०० हून अधिक महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून जवळपास ३ लाखांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत देण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या प्रदर्शनांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना त्यांच्या बनवलेल्या दिवाळी फराळ व उत्पादनांच्या विक्री यासाठी व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर सहभागी महिलांना व्यावसायिक संधीही उपलब्ध झाल्या. या प्रदर्शनांना स्थानिक ग्राहकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला.

बचत गटांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या महिलांचे सशक्तीकरण होण्यास मदत होते. या उपक्रमाने महिलांना एक नवीन व्यावसायिक दिशा मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी काळात या स्वयं-सहाय्यता गटांना आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. – ममता शिंदे, उपायुक्त

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"