पिंपरीत 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार!

स्वतः बांधा आणि संचलित करा या तत्त्वावर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना विद्युत वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका 22 ठिकाणी खाजगी संस्थेद्वारे चार्जिंग स्थानके उभारणार आहे. स्वतः बांधा आणि संचलित करा या तत्त्वावर स्थानके उभारली जाणार आहेत .

पिंपरी चिंचवड मध्ये 23 लाखाहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत .त्यामध्ये 50 हजाराहून अधिक विद्युत वाहनांचा समावेश आहे .स्वतः बांधा आणि संचलित करा या तत्त्वावर ही स्थानके उभारली जाणार आहेत .यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही .संबंधित संस्थेला जागा उपलब्ध करून दिली जाईल .या जागेवर दहा वर्षाकरिता स्वतःच्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेणे, चार्जिंग स्थानक उभारणे आणि चालन व देखभाल करणे या बाबी संस्थेने करणे आवश्यक आहे. मात्र तीन वर्षे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .त्यामुळे प्रत्येक वेळी अटी शर्ती बदलत चार वेळा नव्याने निविदा प्रसिद्ध करावी लागली .
एका खाजगी संस्थेला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ही संस्था ग्राहकासाठीच्या कमाल मर्यादा दराप्रमाणे प्रति युनिट 17 रुपये अधिक सेवा व वस्तू कर अशी रक्कम चार्जिंग शुल्क म्हणून ग्राहककडून वसूल करू शकते. वीज वितरण कंपनीच्या विद्युत शुल्कात वाढ झाल्यास त्यानुसार संस्थेला ग्राहकाकडून रक्कम वसूल करता येणार आहे. एका चार्जिंग स्थानकासाठी अंदाजे 69 लाखाचा खर्च असून 22 स्थानकासाठी वीस कोटीचा खर्च अपेक्षित आहे .
महापालिकेने चार्जिंग स्थानकांसाठी ठिकाणी निश्चित केली आहेत .महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण ,जुना पुणे मुंबई महामार्ग, दुर्गादेवी टेकडी ,वाहतूक नगरी, बर्ड व्हॅली संभाजीनगर ,बजाज ऑटो ,कुस्ती संकुल भोसरी ,मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर ,चिखली, मलनिस्सारण केंद्र संत नगर उद्यान कासारवाडी, कोकणी चौक ,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ,लांडेवाडी भोसरी ,भक्ती शक्ती निगडी ,संत तुकाराम नगर मेट्रोस्थानक ,पिके चौक ,योगा पार्क पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पिंपळे गुरव ,वल्लभनगर ,ऑटो क्लस्टर आणि राजश्री शाहू उद्यान या ठिकाणांच्या जागा निश्चित केल्या आहेत.

