“आंतर क्लब स्पर्धेतून पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग”!

इच्छुक क्लबनी दिनांक २२ ऑक्टोबर पूर्वी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणीचे आवाहन
पिंपरी :पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या “आंतर क्लब स्पर्धेतून पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग” स्पर्धेकरिता खेळाडूंना मिळणार क्रिकेट खेळण्याची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतर क्लब टी-ट्वेंटी पिंपरी चिंचवड करंडक स्पर्धेचे आयोजन दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ पासून फोर स्टार क्रिकेट ॲकॅडमी हिंजवडी येथील मैदानावर करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतून जो विजयी संघ होईल त्या संघाला रोख रक्कम रुपये २५०००/- व चषक द्वितीय क्रमांकाच्या संघाला रक्कम रुपये १५०००/- व चषक व तृतीय क्रमांकासाठी रक्कम रुपये५०००/- व चषक तसेच
उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट अष्टपैलु खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
तरी इच्छुक क्लबनी दिनांक २२ ऑक्टोबर पूर्वी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करायची आहे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे जगदीश शेट्टी यांनी केले आहे.
या स्पर्धेतून जानेवारी मध्ये होणाऱ्या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग स्पर्धेच्या ऑक्शन करिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड परिसरातील क्रिकेट क्लब तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या अंतर्गत येणारे (आळंदी तळेगाव देहू रोड मान हिंजवडी चाकण ) या परिसरातील क्रिकेट क्लब स्पर्धेत सहभागी होऊ शकतील असे उपाध्यक्ष वसंत भाऊ कोकणे यांनी कळविले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री राजू कोतवाल मो नंबर – ९९२२५०२४१४ व श्री. मुकेश गुजराथी मो नंबर – ९८२२७८१९१४ यांच्याशी संपर्क साधावा.

