फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
पिंपरी-चिंचवड

कळंब धाराशिव येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप!

कळंब धाराशिव येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप!

दोस्ती फाउंडेशन भोसरी तर्फे समाजासाठी दिलासा देणारा उपक्रम
खोंदला : ता कळंब जिल्हा धाराशिव, “एक पाऊल समाजहितासाठी” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत दोस्ती फाउंडेशन तर्फे ता कळंब जिल्हा धाराशिव, हसेगाव, सात्रा, खोंदला आणि पाथर्डी परिसरातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना एकूण ६०० शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

“आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो” या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. पूरामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची उमेद जागवण्याचे कार्य फाउंडेशनने केले आहे.
या सामाजिक उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे तसेच संजय सातव, संजय भोसले, माणिक पडवळ, मच्छिंद्र बुरडे, महेश लोंढे, विशाल बुरडे आणि अमित सुतार यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.

पाथर्डी येथील उद्योजक शरद सावंत आणि युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांच्या, अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. गावकऱ्यांनी या कार्याचे मनापासून कौतुक करत उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच शालेय समिती आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करत दोस्ती फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"