फक्त मुद्द्याचं!

16th February 2026
पिंपरी-चिंचवड

वीजदरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी यासाठी आंदोलन!

वीजदरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी यासाठी आंदोलन!

भोसरी विभागीय महावितरण कार्यालय येथे निषेध आंदोलन
पिंपरी : ऐन दिवाळीच्या थेट तोंडावर महावितरणने घरगुती, व्यवसाय,औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति युनिट ३५ पैसे ते ९५ पैसे अशी जुलमी सुलतानी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी याच ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. ही सुलतानी वीजदरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी व सर्व वीज ग्राहकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवार दि.८  ऑक्टोबर रोजी भोसरी विभागीय कार्यालय महावितरण येथे निषेध आंदोलन करण्यात आले.  विभागीय कार्यालयाचे मुख्य अभियंता अतुल देवकर यांनी निवेदन स्वीकारले असे माजी नगरसेवक मारुती भापकर यानी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

viara vcc
viara vcc

महावितरणच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याकरता कर्मचाऱ्यांची संख्या व शिडी गाड्यांची संख्या कमी असणे, कुठलेही काम करायचे म्हटले तर निधी नाही अशा सबबी सांगणे, साधी सर्विस वायर बदलायची असेल तरी ती ग्राहकांना स्वखर्चाने आणायला लावणे. वेळोवेळी भार नियंत्रित न राहिल्यामुळे व विजेच्या लपंडावामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होणे, अनेक गंभीर अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होणे, मृत्यू होणे. वीजग्राहकांना शारीरिक, मानसिक,आर्थिक त्रासाला वीज ग्राहकाला रोज सामोरे जावे लागत आहे.

महावितरणने केलेली वीज दरवाढ १ते १०० प्रति युनिट साठी ३५ पैसे, १०१ ते ३०० प्रति युनिट साठी ६५ पैसे,३०१ ते ५०० प्रति युनिट ८५ पैसे,५०१ पेक्षा जास्त प्रति युनिट ९५ पैसे अशी दरवाढ याच ऑक्टोबर महिन्याच्या बिलामध्ये होणार आहे.

सणासुदीच्या खरेदी सोबत महावितरणची ही दरवाढ सर्व ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी, डोक्याला काळी रिबीन बांधून व काळे झेंडे दाखवून या दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विभागीय कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री अतुल देवकर यांनी निवेदन स्वीकारले. सरकारकडे तुमचे निवेदन पाठवले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनात माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यासह, मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, काँग्रेस पक्षाचे मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम, जिवन बोऱ्हाडे, धम्मराज साळवे काशिनाथ जगताप (राष्ट्रवादी श.प.) अरुण पवार, काँग्रेसचे ज्ञानेश्वर मलशेट्टी, सालार शेख, शिवशंकर उबाळे, सुरेश भिसे, विष्णू बिरादार, रावसाहेब गंगाधरे, सोमनाथ शेळके, अनिल करंदीकर,आदेश लुकंड‌ माधव नेरलेकर, काँग्रेसचे बी बी शिंदे, विशाल भालेराव, दीपक भंडारी, सोनवणे प्रताप, सतीश भोसले, आणि देवराम गोरख, हिरामण खवळे, सर्जेराव पाटील, नारायण बिरादार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"