फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

सफाई सेवक हे शहराचे खरे स्वच्छता दूत : उप आयुक्त अण्णा बोदडे

सफाई सेवक हे शहराचे खरे स्वच्छता दूत : उप आयुक्त अण्णा बोदडे

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित विचार प्रबोधन पर्वात सफाई सेवकांचा गौरव
पिंपरी, ७ ऑक्टोबर २०२५: “सफाई सेवक” हे शहराचे खरे स्वच्छता दूत आहेत. त्यांच्या अविरत सेवेमुळेच पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहते. त्यांच्या योगदानामुळेच शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये देशात सातवे आणि राज्यात पहिले स्थान मिळवले. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाद्वारे समाज जागृती केली, तसेच हे सफाई सेवक आपल्या कार्यातून स्वच्छतेचा संदेश देतात, असे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रतिपादन केले.

viara vcc
viara vcc

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित “महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्व २०२५” च्या उद्घाटन उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान येथे झालेल्या या विचार प्रबोधन पर्वात सफाई सेवकांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे सत्र अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वात शहरातील गुणवंत सफाई सेवकांचा गौरव करण्यात आला यावेळी माजी नगरसदस्य धनराज बिर्दा, उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित, विधीतज्ञ ॲड. सागर चरण,जनता अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयातील सफाई सेवक,रूग्णालयातील आया, वाॅर्डबाॅय तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी आरोग्य निरीक्षक गोपाळ धस, संदीप राठोड, समाधान कातड, तसेच सफाई सेवक संजय हिंगणे, नवनाथ पिंगळे, अरुणा शेंडे, सुनीता सांगडे, मालती दुबळे, सुमन तांबे, दिपक सारसर,रामकुमार वाल्मिकी, यल्लमा पद्री, रेखा सरपटा,संदीप लांडगे,शाम भालेकर, राजाराम लोंढे,वामन जठार, मनिषा दुबळे, वैशाली कांबळे, दिगंबर वायकर,विक्रम कोकणे,वैभव बुर्डे, अलका आढारी, जयश्री चव्हाण,सुनिल बंडवाल, मनोज गायकवाड,आदित्य राजीवाडे,शर्मिला बुचुडे, जयश्री मलकेकर,जयवंत गायकवाड,गणेश कोंढाळकर, संजिवनी पवार,छाया एखंडे,संगिता भिसे,राकेश चव्हाण, संजना जाधव,महादेव जाधव,विनोद वाल्मिकी,रूपेष बोध, लक्ष्मी लोंढे,रेखा जगताप,राजू वावरे,विलास गडे,कृष्णा देडे,मारुती शिंदे,अनिल पाथरमल, मीना जगताप,जयेंद्र गायकवाड,अनंता भालचीम,कमलेश गायकवाड,राकेश चव्हाण,महादेव जाधव यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
महिला सफाई सेविकांसाठी “खेळ पैठणी”महिला सफाई सेविकांसाठी “खेळ पैठणी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांना उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बहारदार संगीताचा नजराणा – “व्हाईस ऑफ मेलडी”
सेवकांचे मनोरंजन व्हावे तसेच त्यांच्या कला आणि गुणांना वाव मिळावा, यासाठी “व्हाईस ऑफ मेलडी” या विनोद निनारिया यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गाणे “आने वाला कल जानेवाला है” (आर. डी. बर्मन) या गाण्याने झाली. त्यानंतर जुन्या हिंदी व मराठी गाण्यांच्या रेशीम सुरांनी संपूर्ण सभागृहात संगीताचा सुंदर माहोल निर्माण केला. या कार्यक्रमात अनेक सफाई सेवकांनीही गायन व तालासुरांमध्ये सहभाग घेतला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"