फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांचा ई-लिलावास दोन दिवस शिल्लक!

आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांचा ई-लिलावास दोन दिवस शिल्लक!

नावनोंदणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत मौजे आकुडी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यासाठी ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. या ई लिलावसाठी शेवटचे दोन दिवस राहिल्याने महिला बचत गटांनी २८ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

navratra 5
navratra 5

आकुर्डी येथे एकूण 49 गाळे ई- लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात दिव्यांग महिला बचत गटांसाठी २, तृतीयपंथी गटासाठी १, कोविड योद्धा महिला बचत गटासाठी १, आदिवासी महिला बचत गटासाठी २, DAY-NULM अंतर्गत ३, तर पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी ४० गाळ्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बचत गटांनी १०,००० रुपये सहभाग शुल्क व ५०० रुपये न परताव्या नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना संबंधित बचत गटाची नोंदणी प्रमाणपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, शॉप अॅक्ट लायसन्स व आवश्यक परवाने सादर करणे बंधनकारक आहे.

गाळे व्यवसायासाठी प्रथम तीन वर्षांसाठी देण्यात येणार असून कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. भाडे व देखभाल शुल्क गटानेच भरायचे असून वेळेत भरणा न झाल्यास दंड आकारला जाणार आहे. गाळ्यांचा वापर केवळ नोंदणीकृत बचत गटांनाच करता येणार असून पोटभाड्याने देणे किंवा बेकायदेशीर कामकाज झाल्यास गाळा जप्त करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

इच्छुक २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत गाळ्यांची पाहणी करू शकतात. अधिक माहितीसाठी समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फोन : ०२०-६७३३१५६६) किंवा रिलायन्स ऑक्शनियर्स (मोबाईल : ९८२२०८२२१९) यांच्याशी संपर्क साधावा, किंवा असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"