पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुमारे 3000 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .याशिवाय मिरवणुकीत डीजे आणि धिंगाणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराच पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चौका- चौकात पोलीस बंदोबस्त असणार आहे . पिंपरी चिंचवड आयुक्तालय कक्षेत सुमारे 3000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे . यामध्ये एक सहपोलीस आयुक्त, एक अप्पर पोलीस आयुक्त , सहा पोलीस उपायुक्त , सहा सहाय्यक पोलीस आयुक्त , 64 पोलीस निरीक्षक , 2 350 पेक्षा अधिक अंमलदार , 291 सहाय्यक निरीक्षक , उपनिरीक्षक, 400 होमगार्ड , एक बॉम्बशोधक आणि नाशक पथक. 17 शीघ्रकृती पथक, सहा दंगलनियंत्रक पथके आणि दोन राज्य राखीव पोलीस दल यांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.