परिवर्तिनी एकादशी निमित्त आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी!

श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट; इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद
आळंदी : येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी एकादशी दिनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती.

आळंदी मंदिरात भाविकांनी परिवर्तिनी एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, कीर्तन, रात्री धुपारती, शेजारती, हरिजागर झाला. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नान केले.
आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचेसह सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिस उपस्थित होते.
एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे संयोजक राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी सांगितले. या प्रसंगी संयोजक अर्जुन मेदनकर, अनिल शिंदे, शालन होणावळे, केसरबाई कदम, लक्ष्मीबाई पडळकर, जयश्री ताई टकले, कौशल्या देवरे, नीलम कुरदोंडकर, राधा पगारे, पुष्पा लेंडघर, मंगला कुलकर्णी, सुरेखा काळभोर, राधा मुंगसे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, मोरे मावशी, सावित्री घुंडरे पाटील, विमल मुसळे, सुनंदा चव्हाण, प्रज्ञा जाधव, ताराबाई मुंगसे, बेबीताई वीरकर, शिवसेना उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील, अमर गायकवाड, राजेंद्र जाधव यांचेसह वारकरी, महिला भाविक, नागरिक उपस्थित होते. यासाठी पाहणी मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी पाहणी केली.