गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात महिलांचे अथर्वशीर्ष पठण!

पिंपरी : भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी, शेगावीचा राणा श्री गजाननमहाराजांची पुण्यतिथी आणि कलावतीदेवी यांची जयंती या मंगलदिनांचे औचित्य साधून, दोन्ही गुरूंना वंदन करून गांधीपेठ महिला मंडळात गणपती बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण मंगलदायी वातावरणात संपन्न झाले. अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात कस्तुरी जमखंडी आणि प्रभावती इंदलकर यांनी केली.
गणपतीसाठी शंखवादन सेवा आणि अथर्वशीर्ष आरती सविता दुमडे, प्रांजली पानसे यांनी केली. अथर्वशीर्ष पठणास गांधीपेठ महिला मंडळातील माया थोरात, शैला जमखंडी, रेश्मा जमदाडे, अश्विनी थोरात, कविता गोलांडे, सुजाता गोलांडे, चंद्रकला शेडगे, रत्नमाला बोरकर, मंगल नेवाळे, सिद्धी नेवाळे, हेमा सायकर, मंदाकिनी चोपडे, मंडळाच्या अध्यक्ष गीतल गोलांडे आणि गांधी पेठ महिला मंडळाच्या अन्य सभासद अशी सुमारे पन्नास महिलांची याप्रसंगी उपस्थिती होती.
“सती अनुसया सत्वपरिक्षा अर्थात श्री.गरुदेव दत्त जन्म”!

मोहननगर येथील जयभवानी तरुण मंडळाने सती अनुसया सत्वपरिक्षा अर्थात श्री.गरुदेव दत्त जन्म हा देखावा आकर्षक पध्दतीने सादर केला आहे. मंडळाचे यंदा 42 वे नर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष मारुती भापकर, उपाध्यक्ष दिपक सुकल, सचिव पप्पुलाल शेख,सहसचिव सतिश चव्हाण,खजिनदार शैलेश कोळी,सह खजिनदार अभिजित भापकर. उत्सव प्रमुख नाना खरात, कचरू पोटघन, अभिजित वेंगुर्लेकर,सागर कणसे, संतोष खुंटे, संतोष खोकर,रमेश कुदळे,शुभम भोसले,राजु राठोड, पप्पू दाभोळे, गोरख भापकर,प्रदिप कदम,गोरख देवकाते आदींचा समावेश आहे.