विकास गर्ग यांची श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या अध्यक्षपदी निवड!

पिंपरी : चिंचवड प्राधिकरण येथील श्री अग्रसेन भवनात नव्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत झालेल्या मतदानाच्या निकालानुसार विकास टी. गर्ग यांची ९०० हून अधिक सभासद असलेल्या श्री अग्रसेन ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

सर्वसाधारण सभेत १८ ऑगस्ट रोजी झालेल्या पंच कमिटीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, वेदप्रकाश गुप्ता व रामअवतार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पंच कमिटीच्या वतीने कृष्णकुमार गोयल यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांना मावळते अध्यक्ष सुनील अग्रवाल व सतपाल मित्तल यांचा सहकार्य लाभला.
नवीन कार्यकारिणीत अशोक आर. अग्रवाल, प्रवीण एन. अग्रवाल, आशीष प्रेम गर्ग, रमेश कश्मीरीलाल अग्रवाल, मोहन गर्ग, जगमोहन अग्रवाल, विकास टी. गर्ग, राजेश मामनचंद अग्रवाल, धर्मेंद्र अग्रवाल, महावीर मनोहरलाल बंसल, दिनेश रामगोपाल अग्रवाल, विनोद बालकिशन मित्तल, नरेश हुकुमचंद गुप्ता, पवन अग्रवाल व लाजपत मित्तल यांचा समावेश आहे.
ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच एखाद्या युवा सदस्याची अध्यक्षपदी निवड झाली असून विकास गर्ग हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. समाजासाठी ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे.